इंडियन क्राफ्ट मेळाव्याचं आयोजन


इंडियन क्राफ्ट मेळाव्याचं आयोजन
SHARES

बोरीवली पश्चिम- कोराकेंद्र मैदानात इंडियन क्राफ्ट मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 18 ते 31 ऑक्टोबरपर्यंत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याचं आयोजन भारत सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. या मेळाव्याचं उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यात देशभरातून आलेल्या कुशल कारागिरांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यात ठेवण्यात आलेल्या वस्तू या दुकानदारांनी स्वत: बनवल्या आहेत. दिवाळीसाठी लागणारं सामानही इथं उपलब्ध आहे.

संबंधित विषय