Advertisement

विठूभक्तीत रंगले शिवा-सिद्धी

अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधान असलेल्या पंढरीची आषाढी वारी पंढरपूर मुक्कामी पोहोचायला अवघे काही दिवस उरले आहेत. बरेच कलाकारही वारीत हजेरी लावत विठूनामाच्या गजरात रंगत असताना 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील शिवा आणि सिद्धीही विठूभक्तीत रंगले आहेत.

विठूभक्तीत रंगले शिवा-सिद्धी
SHARES

अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधान असलेल्या पंढरीची आषाढी वारी पंढरपूर मुक्कामी पोहोचायला अवघे काही दिवस उरले आहेत. बरेच कलाकारही वारीत हजेरी लावत विठूनामाच्या गजरात रंगत असताना 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील शिवा आणि सिद्धीही विठूभक्तीत रंगले आहेत.


पांडुरंगानंच एकत्र आणलं

कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमधील शिवा आणि सिद्धी या मुख्य व्यक्तिरेखाही पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होताना दिसणार आहेत. कपाळी गंध, सदरा, टोपी, भगवा झेंडा, सिद्धीच्या डोक्यावर तुळसी वृंदावन, शिवाच्या हातातील टाळ, वारीमधील गावकऱ्यांचा सहभाग आणि जय जय रामकृष्ण हरी या जयघोषामुळं मालिकेतील संपूर्ण वातावरण मंगलमय झालं आहे. सगळी भांडण, हेवेदावे विसरून या खास क्षणासाठी शिवा आणि सिद्धी एकत्र आले आहेत. जणू काही पांडुरंगानंच त्यांना एकत्र आणलं आहे. हा खास भाग जीव झाला येडापिसा मालिकेत या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


भक्तीमय वातावरण 

वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंगाच्या गजरात तल्लीन झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून येतात लाखो भक्त वारीसाठी येतात. मालिकांमध्ये नेहमीच सणा-सुदीचं वातावरण पहायला मिळणार आहे, पण वारीच्या निमित्तानं जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये भक्तीमय वातावरण बघायला मिळणार आहे. केवळ शिवा आणि सिद्धीच नव्हे तर त्यांच्यासोबत इतर व्यक्तिरेखाही विठूनामाच्या जयघोषात न्हाऊन निघणार आहे. मालिकेतील आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांना वारकऱ्यांच्या रूपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.हेही वाचा -

रुपाली-अभिजीतमध्ये रंगणार कॅप्टन्सीची लढत

Video: 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे परत येतोय… ‘या’ तारखेला
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा