Advertisement

संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला!


संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला!
SHARES

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त 'संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राला पूर्वीपासून लाभलेली लोककला लोकांपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सदानंद राणे दिग्दर्शित 'सांस्कृतिक जागर' हा कार्यक्रम दत्ता म्हात्रे सादर करीत आहेत, अशी माहिती विद्यार्थी भारती विद्यापीठ प्रवक्ता पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

'संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला' हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता सफाळा पूर्व इथल्या नारोडा परिसरातील मराठी शाळा क्रमांक १ येथे होणार आहे. शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. तर प्रमुख पाहुणे गणाई संस्थापक किशोरदादा जगताप, सहाय्यक पोलीस निरिक्षक मानसिंग पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, वाघिणीच्या अध्यक्षा ज्योती बडेकर, मराठी भारती राज्याध्यक्षा पूजा बडेकर आणि विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा विजेता भोनकर उपस्थित राहणार आहेत, असे विद्यार्थी भारती विद्यापीठ कार्याध्यक्षा मोनाली भोईर यांनी सांगितले.

तसंच यावेळी शरीरसौष्ठवपटू शशिकांत गुडे यांना पालघरभूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना पुरस्कार देऊन सन्मानितही करणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा