Advertisement

वरळीत 3 दिवसीय आंबा महोत्सव


वरळीत 3 दिवसीय आंबा महोत्सव
SHARES

वुमेन लीगल फोरम फॉर हौसिंग सोसायटी आणि वरळी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वरळी मधील आदर्श नगरच्या मैदानात 12 मे पासून 14 मे पर्यंत आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. या 3 दिवसीय आंबा महोत्सवात 10 शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण, आणि वलसाड या ठिकाणाहून आंबे विक्रीसाठी आणण्यात आले आहेत.

150 रुपये, 300 रुपये, 500 रुपये डझन असे या आंब्याचे दर आहेत. 12 तारखेला सायंकाळी आदर्शनगर येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. एन. इंगोले यांच्याहस्ते या आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.


6 जानेवारीपासून दर शुक्रवारी या मैदानात शेतकरी आठवडी बाजार भरवला जातो. आम्ही दर शुक्रवारी या आठवडी बाजारात येऊन आठवड्याची भाजी खरेदी करतो. या आठवडी बाजाराच्या निमित्ताने ताजी फ्रेश भाजी खायला मिळते. आंबा महोत्सवाच्या निमित्ताने चांगल्या दर्जाचे आंबे आम्हाला खायला मिळत आहेत. याचा आनंद आम्हाला होतोय.

प्रीती महाडिक, स्थानिक

ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबे खरेदी करता येत आहेत ही खूप चांगली बाब आहे. थेट बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या लक्षात घेऊन कुठेतरी त्याला आळा बसावा यासाठी आठवडी बाजार एक उत्तम पर्याय आहे.

आर. एन. इंगोले, सहाय्यक धर्मादाय आयुक्त

वरळीकरांचा आंबा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद आहे. आम्हा शेतकऱ्यांना हे विक्रीसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. आम्ही पुण्यातून आलो आहोत. पुण्यात अनेक आंबा महोत्सवात आम्ही सहभागी झालो आहोत. पण मुंबईमधली ही पहिलीच वेळ आहे आणि वरळीकरांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.

मुकेश अहिरे, शेतकरी

आम्ही आठवडी बाजार 6 जानेवारीपासून सुरू केला आहे. वरळीमध्ये प्रत्येक शुक्रवारी हा आठवडी बाजार भरतो. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असल्यामुळे पुढच्या काळात फळे, भाज्यांबरोबरच ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेऊन शेतकरी महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सुनीता गोडबोले, अध्यक्ष, वुमेन लीगल फोरम

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा