Advertisement

'सिंधू' मालिकेत सुरू झाली लगीनघाई

काही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. अशांपैकीच एक असलेल्या 'सिंधू' या मालिकेत सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पहायला मिळणार आहे.

'सिंधू' मालिकेत सुरू झाली लगीनघाई
SHARES

काही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. अशांपैकीच एक असलेल्या 'सिंधू' या मालिकेत सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पहायला मिळणार आहे.

'सिंधू' या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एका सामान्य मुलीची असामान्य कथा पहायला मिळत आहे. अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या चिमुरड्या 'सिंधू'चा आता विवाह होणार आहे. एकोणिसाव्या शतकातील ही मालिका असल्यानं हा बालविवाह आहे. देवव्रतशी लग्न होत असल्यानं सिंधूच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. यानिमित्त फक्त मराठीची नवनिर्मिती असलेल्या 'सिंधू... एका सामान्य मुलीची असामान्य कथा' या मालिकेच्या सेटवर लगीनघाई आहे. 

अष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यानुसार मालिकेच्या ट्रॅकमध्ये आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी असा सगळा लग्नी तामझाम बघायला मिळेल. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज असेल. त्यासाठी खास प्रॉपर्टी, साड्या, दागिने अशी सगळी तयारी करण्यात आली आहे. सिंधूच्या प्रमुख भूमिकेतील अदिती जलतारे आणि देवव्रत साकारत असलेला श्रीहरी अभ्यंकर हे दोन्ही बालकलाकार त्यांचे अभिनयकौशल्य दाखवत आहेत. एकूणच गौरी किरण, मेघा मटकर, प्रभाकर वर्तक, शाश्वती पिंपळीकर, पूजा मिठबावकर आणि संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.      

खरं तर कोवळ्या वयात विवाहबंधनात अडकत असल्यानं सिंधू असो वा देवव्रत दोघांनाही नेमकं लग्न म्हणजे काय याची विशेष कल्पना नाही. मात्र आता यापुढं धाकटी आई भामिनीच्या जाचातून सिंधूची सुटका होईल अशी सगळ्यांना आशा आहे. आता यापुढं सिंधूच्या आयुष्यात नेमकं काय काय घडेल हे 'सिंधू'च्या पुढील भागांमध्ये पहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

कोण असेल फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ? 

‘सेक्रेड गेम्स’ वादात, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अनुराग कश्यपविरोधात तक्रार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा