Advertisement

महिलांसाठी 'स्त्री सन्मान' हेल्पलाईन


महिलांसाठी 'स्त्री सन्मान' हेल्पलाईन
SHARES
Advertisement

सीएसटी - दिवसेंदिवस समाजात महिलांच्या अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून 'स्त्री सन्मान' या एका नवीन हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे. शायना एनसी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मंगळवारी या हेल्पलाईनची स्थापना केली. 'आय लव्ह मुंबई' या संस्थेतर्फे महिला हेल्पलाईन 'स्त्री सन्मान'ची स्थापना करण्यात आली आहे.

मला येणाऱ्या अश्लील मेसेजमुळे मी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी वेळेवर योग्य ती कारवाई केली. मी सर्व स्त्रियांना प्रामाणिक आवाहन करते की अशा घटना घडल्यास त्या समोर आणण्याची हिंमत दाखवा आणि असामाजिक तत्त्वांना चांगली अद्दल घडवा असं आवाहन शायना एनसी यांनी या कार्यक्रमादरम्यान केलं. छळवणूक सहन करणाऱ्या महिला यापुढे न घाबरता पुढे येऊन तक्रार देतील आणि त्यामुळे गुन्हेगार पकडले जातील, अशी अपेक्षा असल्याचंही त्या म्हणाल्या.

ही हेल्पलाईन वेबसाईट, फोन, व्हॉट्सअॅप या माध्यमातून जोडली जाणार असून यासाठी बॅकअप टिम कार्यरत असणार आहे.तसंच या हेल्पलाईनच्या मदतीने पोलीस ठाण्यात संबंधित अपराधी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यास देखील मदत केली जाईल, असं शायना एनसी यांनी सांगितलं. ८८८८८०९३०६ हा स्त्री सन्मान महिला हेल्पलाईनचा क्रमांक आहे.

संबंधित विषय
Advertisement