Advertisement

क्रिकेट नव्हे, विराट खेळणार फुटबॉल!


क्रिकेट नव्हे, विराट खेळणार फुटबॉल!
SHARES

भारतीय क्रिकेट शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला इंडियन टीमचा कॅप्टन विराट कोहली आपल्या टीमसोबत १५ ऑक्टोबरला मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पेलक्समध्ये एक मॅच खेळणार आहे. ही मॅच क्रिकेटची असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण तसं नाहीय. विराट फुटबाॅलची मॅच खेळणार असून 'सेलिब्रिटी क्लासिको' २०१७ अंतर्गत बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स असा सामना येथे रंगणार आहे. फुटबॉल मैदानातही विराट टीमचा कॅप्टन असेल.

या सामन्यात विराट 'ऑल हार्ट फुटबॉल क्लब' संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. तर 'ऑल स्टार्स फुटबॉल क्लब'चा कर्णधार बॉलीवूड स्टार रणबीर कपूर असेल. विराटने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने या सामन्याची माहिती दिली आहे.



सामन्याला या, आम्हाला खेळताना बघा आणि चॅरिटी कार्यात सहभागी व्हा. तुमच्या चिअर करतानाचा आवाज नक्कीच आम्हाला येईल, असं आवाहन विराटने केलं आहे. या सामन्याचं आयोजन अभिषेक बच्चन आणि विराट कोहली यांच्या चॅरीटी संस्थेने मिळून केलं आहे. याआधी देखील क्रिकेटर आणि बॉलीवूड स्टार्समध्ये सामना झाला होता.


विराटच्या संघातील खेळाडू

ऑल हार्ट फुटबॉल क्लब: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, धोनी, उमेश यादव, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, यजुवेंद्र चहल, बोपन्ना, अनूप, केदार जाधव, दिग्विजय, जॉन्टी होऱ्ड्स, शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, पी. आर श्रीजेस, अनूप श्रीधर, बी मंगलदास, पवन नेगी


रणबीरच्या संघातील खेळाडू

ऑल स्टार्स फुटबॉल क्लब: रणबीर कपूर (कॅप्टन), अभिषेक बच्चन, निशांत मेहता, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, दिनो मोरिया, लिएंडर पेस, शशांक खेतान, राज कुंद्रा, शब्बीर अहलुवालिया, सचिन जोशी, मार्क रॉबिन्सन, शूजित सरकार, जिम सरभ, विवियन डसना, करनवीर मेहरा, अपारशक्ती खुराना, आदर जैन, विक्रम थापा, रोहन श्रेष्ठा, अरमान जैन, हरप्रीत बावेजा आणि कार्तिक आर्यन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा