बॉडीलाइन संघाच्या 'कॅरेन पेस'ची हॅट्रीक

 Mumbai
बॉडीलाइन संघाच्या 'कॅरेन पेस'ची हॅट्रीक

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन वुमन लीग 2017 मध्ये कपाडियानगर एफसीवर बॉडीलाईन एफसीने 6-0 ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे कॅरन पेस हिने आपल्या उत्कृष्ट खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने हॅट्रीक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हा सामना गुरुवारी कर्नाटका एसए ग्राऊड, कॉस मैदान येथे रंगला.

बॉडीलाईन एफसी संघाची स्ट्रायकर कॅरेनने सुरुवातीला अवघ्या आठ मिनिटात गोल केला. तर पुढच्या तिसऱ्या मिनिटाला तिने दुसरा गोल करत प्रतिस्पर्ध्यांचे लक्ष वेधले. अखेर अर्ध्यावेळात तिने तिसरा गोल करून हॅट्ट्रीक करण्याचा विक्रम केला. तर दुसऱ्या सत्रात ट्रीसिया कोलॅको हिने दोन गोल केले. पहिला गोल 44 मिनिटाला तर दुसरा गोल तिने 45 व्या मिनिटाला करत आघाडीत भर घातली. दुसरीकडे 48 व्या मिनिटाला रिटाकसिका उकचुक्वू हिने सहावा गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. कपाडियानगर एफसीला एकही गोल करता आला नाही.

Loading Comments