Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील घटनेच्या चौकशीचे आदेश

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटमधील भीषण आगीत झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील घटनेच्या चौकशीचे आदेश
SHARES

भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला भीषण आग लागून
दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागून धुरामुळे गुदमरुन बाळांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.  मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटमधील भीषण आगीत झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.  संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.


मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत.. बालकांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा