Advertisement

मालाड पी-उत्तर वाॅर्डात स्क्रिनिंगसाठी २० टीम तैनात

मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर वाॅर्डाअंतर्गत येणाऱ्या मालाड परिसरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पुढं गेली आहे

मालाड पी-उत्तर वाॅर्डात स्क्रिनिंगसाठी २० टीम तैनात
SHARES

मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर वाॅर्डाअंतर्गत येणाऱ्या मालाड परिसरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पुढं गेली आहे. येथील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासन अग्रक्रमाने उपाययोजन करत आहे. त्यानुसार परिसरातील रहिवाशांचं स्किनिंग करण्यासाठी २० टीम तयार करण्यात आल्या आहेत. 

रुग्ण दुपटीचा वेग

एका बाजूला मुंबईतील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा वेग मंदावून तो आता २३ दिवसांवर आलेला असताना पी-उत्तर हा एकमेव वाॅर्ड त्याला अपवाद ठरत आहे. येथील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा वेग हा ११ दिवसांवर आहे. परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन नीट होत नसल्यानेच कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणूनच सहाय्यक आयुक्त पी / उत्तर वॉर्ड यांनी एक परिपत्रक काढत १५ जून २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत मढ परिसरात पूर्णत: लाॅकडाऊन लागू केला आहे. 

हेही वाचा - कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड P/North : मालाड, मनोरी, मार्वे, अक्सा आणि मढ

घरोघरी तपासणी

त्यामुळेच महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागामध्ये कंटेन्टमेंट झोन परिसरातील रहिवाशांचं ‘स्क्रिनिंग’ करण्यासाठी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २० टीम तयार करण्यात आल्या असून या टीम प्रत्येक इमारतीत व झोपडपट्टीतील प्रत्येक घरात जाऊन वैद्यकीय तपासणी करणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.


पी-उत्तर विभागात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. (20 teams of doctors and medical staff formed for screening in the P-North division of Greater Mumbai Municipal Corporation. Medical check-ups will be conducted in every building and in every house in the slums. ) यावेळी त्यांच्यासोबत सहायक मनपा आयुक्त संजोग कबरे, पालिका उपायुक्त रंजित ढाकणे, वैद्यकीय अधिकारी व पालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छतेला प्राधान्य

शेख म्हणाले की, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ६ ते ७ वेळा निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कंटेन्टमेंट झोनमध्ये वैद्यकीय शिबीरे घेऊन लोकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. जीवनसत्त्व – सी गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर अशा स्वरुपाच्या केसेमध्ये वाढ होणार हे गृहित धरुन आधीपासूनच विलगीकरण केंद्र व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा - मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा