Advertisement

कल्याण डोंबिवलीत शुक्रवारी ३२९ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता १९ हजार ९६७ झाली आहे. यामध्ये ५७७० रुग्ण उपचार घेत आहेत.

कल्याण डोंबिवलीत शुक्रवारी ३२९ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी पुन्हा ३२९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. ३३६ रुग्ण गेल्या २४ तासांत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.  

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता १९ हजार ९६७  झाली आहे. यामध्ये ५७७० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १३ हजार ८४० रूग्ण बरे झाले आहेत.  तर ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन ३२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६६,  कल्याण प. ६५,  डोंबिवली पूर्व १०७,  डोंबिवली प ५९,  मांडा टिटवाळा ९,  मोहना २० तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे.


डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसंच १ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून बरे झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसंच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -  

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी
संबंधित विषय
Advertisement