Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी कोरोनाचे ३७ नवे रूग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी ( ७ नोव्हेंबर) ३७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी कोरोनाचे ३७ नवे रूग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी ( ७ नोव्हेंबर) ३७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसंच २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये खांदा कॉलनी आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

 पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ८, नवीन पनवेल २, खांदा काॅलनी ४, कळंबोली २, कामोठे ६, खारघर १२, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १४, कळंबोली ७, कामोठे १९, खारघर येथील २३ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३९९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२८४१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५९२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा