पालिकेची पाच रुग्णालये होणार टेक्नोसॅव्ही

 Pali Hill
पालिकेची पाच रुग्णालये होणार टेक्नोसॅव्ही

मुंबई - मुंबई महानगर पालिकेची पाच रुग्णालये आता टेक्नोसॅव्ही होणार आहेत. केईएम, भाभा, कस्तुरबा, ट्रामा सेंटर आणि राजावाडी ही पाच रुग्णालये टेक्नोसॅव्ही होणार आहेत. या पाचही रुग्णालयाच्या संगणकीकरणाकरिता पालिकेकडून 70 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयांतील सर्व कामकाज हे संगणकीय पद्धतीने होणार आहे. रुग्णांची नोंदणी, रुग्णांचे सर्व रिपोर्ट, तसेच त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचार पद्धती आणि औषधांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संकलीत करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर रुग्णांना बारकोड कार्डही देण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्णाला वा डाँक्टरांना हवी तेव्हा रूग्णांची, त्याच्या आजाराची आणि त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Loading Comments