Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (२१ नोव्हेंबर) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (२१ नोव्हेंबर) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १, नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी ३, कळंबोली १२, कामोठे ९, खारघर येथील ३१ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ११, कळंबोली १४, कामोठे १६, खारघर १८, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४७७२ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३७६० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४४२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा