Advertisement

राज्यात मंगळवारी ६२१८ नवे कोरोना रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५८ लाख ६० हजार ९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात मंगळवारी ६२१८ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ६२१८ रुग्ण आढळले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

राज्यातील मृत्यू दर २.४५ टक्के आहे. आतापर्यंत ५१ हजार ८५७ रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. तर २० लाख ५ हजार ८५१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.९६ टक्के झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५८ लाख ६० हजार ९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सध्या राज्यात ५३ हजार ४०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ९३९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ६८३२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार १७७, मुंबई पालिका हद्दीत ६ हजार ११९ तर अमरावती जिल्ह्यात ५५९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा