Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी कोरोनाचे अवघे ७२ नवीन रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१७ ऑगस्ट) कोरोनाचे अवघे ७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू आहे. झाला

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी कोरोनाचे अवघे ७२ नवीन रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१७ ऑगस्ट) कोरोनाचे अवघे ७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये नवीन पनवेेलमधील २, कामोठ्यातील २ तसेच पनवेेल आणि कळंबोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर प्रथमच एवढे कमी रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

सोमवारी तब्बल १७७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील ९, कामोठ्यातील २२, खांदा कॉलनीतील ६, खारघरमधील ११, पनवेलमधील १५, नवीन पनवेलमधील ९, तळोजा येथील १३ रुग्णाचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ९२५५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७६३६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३८१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा