Advertisement

मोठा दिलासा, राज्यात शनिवारी तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के झालं आहे. रविवारी ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मोठा दिलासा, राज्यात शनिवारी तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

राज्यात शनिवारी ५३ हजार ६०५ नवीन रुग्ण आढळले. तर तब्बल ८२ हजार २६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे  होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा आहे. 

मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवीन २६७८ रुग्ण आढळले. तर ३६०८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ४८ हजार ४८४ सक्रीय रुग्ण आहेत.  राज्यात सध्या ६,२८,२१३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२  रुग्ण बरे झाले आहे. 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के झालं आहे. रविवारी ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  ८६४ मृत्यूंपैकी ३९९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

१     मुंबई मनपा   २६६४

२     ठाणे   ५५०

३     ठाणे मनपा   ४८७

४     नवी मुंबई मनपा     २६७

५     कल्याण डोंबवली मनपा     ५५८

६     उल्हासनगर मनपा   ६८

७     भिवंडी निजामपूर मनपा     २०

८     मीरा भाईंदर मनपा   २६३

९     पालघर ६२८

१०    वसईविरार मनपा    ९३४

११    रायगड ८२१

१२    पनवेल मनपा २८१

      ठाणे मंडळ एकूण    ७५४१

१३    नाशिक १७००

१४    नाशिक मनपा २२२४

१५    मालेगाव मनपा      ६४

१६    अहमदनगर   २९१५

१७    अहमदनगर मनपा   ४६५

१८    धुळे   १८५

१९    धुळे मनपा   ६२

२०    जळगाव      ८१४

२१    जळगाव मनपा १७७

२२    नंदूरबार      २२८

      नाशिक मंडळ एकूण  ८८३४

२३    पुणे   ४३५२

२४    पुणे मनपा    २९७७

२५    पिंपरी चिंचवड मनपा २०३३

२६    सोलापूर      १९८६

२७    सोलापूर मनपा ३८५

२८    सातारा २३२३

      पुणे मंडळ एकूण     १४०५६

२९    कोल्हापूर     १५७८

३०    कोल्हापूर मनपा     २८८

३१    सांगली १६४८

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा ३२८

३३    सिंधुदुर्ग      ६३०

३४    रत्नागिरी     ७३४

      कोल्हापूर मंडळ एकूण ५२०६

३५    औरंगाबाद    ६९९

३६    औरंगाबाद मनपा     ४८४

३७    जालना ५७६

३८    हिंगोली १०१

३९    परभणी ३८२

४०    परभणी मनपा ११३

      औरंगाबाद मंडळ एकूण      २३५५

४१    लातूर  ८५६

४२    लातूर मनपा  २२६

४३    उस्मानाबाद   ५६०

४४    बीड   १३६७

४५    नांदेड  ३२४

४६    नांदेड मनपा  १५८

      लातूर मंडळ एकूण   ३४९१

४७    अकोला १९१

४८    अकोला मनपा १६९

४९    अमरावती     १०८५

५०    अमरावती मनपा     २००

५१    यवतमाळ     ६५२

५२    बुलढाणा      १५४७

५३    वाशिम ५८३

      अकोला मंडळ एकूण  ४४२७

५४    नागपूर १७५८

५५    नागपूर मनपा २१४९

५६    वर्धा   ८१८

५७    भंडारा  ५७६

५८    गोंदिया ३०६

५९    चंद्रपूर १२२८

६०    चंद्रपूर मनपा  ४४१

६१    गडचिरोली    ४१९

      नागपूर एकूण ७६९५

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा