दिवसभर 'एसी'मध्ये बसताय? मग तुम्हाला 'हे' त्रास होऊ शकतात...


SHARE

सतत वातानुकूलित वातावरणात म्हणजेच एसीमध्ये बसलात, तर तुम्हाला शरीराचे अनेक आजार होऊ शकतात. थोडंस जरी गरम झालं, तरी आपण एसीत बसतो. ऑफीस वेळेत तर 24 तास एसी सुरू असतो. त्यामुळे बरेच आजार होण्याची शक्यता असते. त्यातही जर, कडक उन्हातून लगेच एसीच्या थंड हवेत गेलात, तर त्याचा आणखी त्रास होतो. ताप, इन्फेक्शन, डोकेदुखी किंवा अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते.


एसीचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

जर तुम्ही कडक उन्हातून लगेच एसीत गेलात, तर तुमच्या शरीराचं तापमान समतोल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार उद्भवू शकतात.

सांधेदुखी - एसीमधून निघणाऱ्या हवेमुळे सांधेदुखीचा आजार होऊ शकतो.

अॅलर्जीची समस्या - एसीत बसून राहिल्याने अॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे आजारही होऊ शकतात. एसीतील फील्टर बराच काळ साफ केला जात नाही. त्यातून निघणारे बॅक्टेरिया आणि धुळीमुळे अॅलर्जी होऊ शकते. शिवाय, सर्दी नसताना सतत शिंका येण्याची शक्यता असते.

थकवा - एसीचं तापमान कमी असतं. ज्यामुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवावं लागतं. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो. त्वचा कोरडी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. एसीमधून नैसर्गिक हवा बाहेर निघत नाही,  त्यामुळे त्वचा कोरडी होते.

सायनस - जे लोक सतत 4 - 5 तास एसीमध्ये बसून असतात,  त्यांना सायनसची समस्या जाणवते.

या सर्व दुष्परिणामांपासून बचाव करायचा असेल, तर एसीच्या हवेपासून थोडं लांब राहायचा प्रयत्न करा. जेणेकरुन या समस्या उद्भवणार नाही.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय