Advertisement

आधुनिक तंत्रज्ञानाचा गरजू रुग्णांना फायदा मिळावा - मुख्यमंत्री


आधुनिक तंत्रज्ञानाचा गरजू रुग्णांना फायदा मिळावा - मुख्यमंत्री
SHARES

वैद्यकीय क्षेत्रात संशोधन होत असून नवीन तंत्रज्ञानामुळे रोगाचं निदान आणि उपचार करणं सोपं झालं आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा गरजू रुग्णांना झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

आरोग्य सुविधा लगेच पोहोचतील अशा ठिकाणी आणि सगळ्यांना परवडतील अशा किंमतीत उपलब्ध होणं आवश्यक आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला उत्तमोत्तम आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. ऑल क्युअर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जोगेश्वरीतील सामान्य नागरिकांना लाभ घेता येणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

जोगेश्वरीच्या ऑल क्युअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॅथ लॅबचे उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन टेलीमेडीसीनद्वारे सेवा देणं शक्य झालं आहे. मेळघाटातील कुपोषणासाठी हरीसाल येथे टेलीमेडिसीनद्वारे सेवा देऊन कुपोषणासारख्या प्रश्नावर काम करता आलं आहे.

महात्मा फुले जन आरोग्य मधून दोन कोटी कुटुंबांना आरोग्य सेवेचा लाभ घेता आला आहे. तर, केवळ पैशा अभावी गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागू नये, म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मदत करण्यात येते. याद्वारे 20 हजार रुग्णांवर दुर्धर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत देण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा