Advertisement

मुंबईतल्या गॅस गळतीचा शोध लावण्यासाठी पालिकेनं पाठवला मसुदा

पालिकेनं हवाई नमुने गोळा करण्यासाठी अग्निशमन दलाची तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) मदत मागितली आहे.

मुंबईतल्या गॅस गळतीचा शोध लावण्यासाठी पालिकेनं पाठवला मसुदा
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) गॅस गळतीच्या अनेक तक्रारी आल्या. पण गॅस गळती नेमकी कुठून होते हे कळू शकलेलं नाही. या कारणास्तव पालिकेनं हवाई नमुने गोळा करण्यासाठी अग्निशमन दलाची तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) मदत मागितली आहे. गेल्या १२ महिन्यांत मुंबईत रहस्यमय गॅस गळतीची तीन तक्रारी समोर आल्या आहेत.

प्रशासनानं गॅस गळती झाल्यास विविध एजन्सीच्या भूमिकेचं चिन्हांकित करणारी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) तयार केली आहे. परंतु, पालिका आयुक्तांनी एसओपीला अंतिम रूप दिले नाही.

वर नमूद केलेल्या तीन गॅस गळतीच्या स्त्रोतांची अद्याप ओळख पटलेली नाही, यामुळे स्थानिकांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि, तिन्ही गॅस गळती दरम्यान एक समान दुवा म्हणजे ते चेंबूर, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी आणि मुलुंड याच भागात नोंदवली गेली आहे.

“एनडीआरएफकडे हवेचे नमुने गोळा करण्याची उपकरणं आहेत. या उपकरणाद्वारे नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते. अतिरिक्त तक्रारीनुसार गॅस गळती हवेत १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबलेली नाही आणि म्हणूनच गळतीचा स्रोत शोधणं कठीण झाले आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-एनईईआरआय) चे संचालक राकेश कुमार म्हणाले की, “हा सतत वास नसल्यामुळे, त्याचा स्रोत शोधणं कठीण आहे. परंतु ज्या ठिकाणी वारंवार तक्रारी येत असतात अशा ठिकाणी सर्व निवासी आणि व्यावसायिक नकाशे असावेत.”

अधिकाऱ्यांद्वारे रहस्यमय गॅस गळतीची तपासणी केली असता, उद्योग आणि धोकादायक सामग्री हाताळणार्‍या कंपन्यांना अग्निशमन दलाला आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यास सांगितलं आहे. यामुळे अधिकाऱ्यांना कारखान्यांमधून रसायने आणि घातक सामग्री वाहून नेणाऱ्या ट्रक आणि वाहनांच्या हालचालींचा अचूक मागोवा घेता येईल.

आश्चर्याची बाब म्हणजे ही गळती कशामुळे झाली याचा अद्याप कोणताही अंतिम अहवाल मिळालेला नाही. तथापि, अधिकाऱ्यांमध्ये सध्या काही सिद्धांत फिरत आहेत. मुंबई फायर ब्रिगेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “स्वयंपाकाच्या गॅसमध्ये एक केमिकल अरोदरंट (इथिल मर्पेटन) जोडले जाते जेणेकरून गॅस अन्यथा गंधहीन असल्यानं गळती शोधणं सोपं होईल.”



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा