Advertisement

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील


२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील
SHARES

मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिक अनेक प्रयत्न करत आहे. दिवसाला बाधित रुग्णांचा आकडा जास्त असल्यानं महापालिकेनं रुग्णांच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. एका इमारतीमधील १० पेक्षा अधिक रहिवाशी कोरोनाबाधित झाल्यास किंवा २ अथवा त्यापेक्षा अधिक मजल्यांवर बाधित रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील करण्याचे नवे आदेश मुंबई महापालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जारी केले.

मुंबईत कोरोनानं शिरकाव केला त्यावेळी कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत सील करण्यात येत होती. त्या इमारतींमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र मनुष्यबळाचा अभाव लक्षात घेत या नियमात सुधारणा करण्यात आली आणि सील इमारतीमधील बाधित रुग्णांचे नातेवाईक, संशयित रुग्णांचे नातेवाईक आणि अन्य रहिवाशांना जीवनावश्यक  वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसेच पालिकेच्या नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती.

मात्र आता कोरोना बधितांचा आकडा वाढत असल्यानं इमारतीमधील एकाच घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती अंशत: सील करण्याचाही निर्णय नव्या आदेशात घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित इमारतीतील परिस्थिती लक्षात घेऊन विंग अथवा मजला सील करण्यात येणार आहे. संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग सील करण्याबाबतचे अधिकार पालिकेच्या विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग सील केल्यानंतर तेथील व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सदस्यांना नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सील इमारत वा भागात वावर होऊ नये यासाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करावा, सील कालावधीत घरकाम करणारे कर्मचारी, भाजी-फळ विक्रेते, धोबी आणि सेवा-सुविधा उपलब्ध करणाऱ्यांना संबंधित इमारतीत प्रवेश देता येणार नाही. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या बाधितांना पालिकेच्या कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय