विक्रोळीत रक्तदान शिबीर

Vikhroli
विक्रोळीत रक्तदान शिबीर
विक्रोळीत रक्तदान शिबीर
विक्रोळीत रक्तदान शिबीर
विक्रोळीत रक्तदान शिबीर
विक्रोळीत रक्तदान शिबीर
See all
मुंबई  -  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विक्रोळीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विक्रोळी पार्क साईट मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहारात सकाळी 11.30 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. भिमसेना युवा संघटनेच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदात्यांनी केलेले हे रक्त सर्वोदय हॉस्पिटलमधील समर्पण ब्लड बँकेला देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रक्तदान केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्रासोबत महाराष्ट्रातील महान व्यक्तींची पुस्तकेही देण्यात आली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशा प्रकारे रक्तदान करून अभिवादन करण्याचा आमच्या संटघटनेचा प्रयत्न असल्याचे भिमसेना युवा संघटनेचे संस्थापक संतोष सुर्वे यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.