Advertisement

२७ छोट्या रुग्णालयांमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार


२७ छोट्या रुग्णालयांमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळं महापालिकेनं उपचारासाठी कंबर कसली आहे. त्यामुळं आता महापालिकेनं ७३ पैकी २७ खासगी आणि छोट्या रुग्णालयांना पुन्हा कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात महापालिकेनं ७३ नर्सिंग होम्समध्ये कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी बंदी घातली, कारण त्यांच्या ऑडिटमध्ये खासगी सुविधांमध्ये ४१ टक्के मृत्यू ऑगस्ट महिन्याच्या मध्य काळात नोंदवलं गेलं.

टास्क फोर्सन परवानगी दिलेल्या आणि ज्या खासगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बऱ्यापैकी सुविधा असतील अशाच रुग्णालयांना कोरोनाचे रुग्ण दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय, २००० अतिरिक्त बेड्स आणि ३०० आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर सरकारी आणि महापालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण आला होता. त्यामुळं छोटी खासगी रुग्णालयं खासगी दवाखाने सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुख्यमंत्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यास सुरुवात केली होती. परंतु, काही छोट्या रुग्णालयांमध्ये कोरोना बधितांवर उपचार करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा परवानगी देण्यात आली असून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय