Advertisement

केंद्राच्या को-विन अॅपच्या वेळेच्या बंधनावर पालिकेची नाराजी

आता लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेण्यासाठी नागरिक रांगेत उभे राहत आहेत.

केंद्राच्या को-विन अॅपच्या वेळेच्या बंधनावर पालिकेची नाराजी
(File Image)
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होतोय. पण आता लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेण्यासाठी नागरिक रांगेत उभे राहत आहेत. नागरिकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलनं रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरणासाठी पालिकेची परवानगी मागितली आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वेळेत मुदतवाढ दिल्यानं अनेकांना कार्यालयीन वेळानंतर येण्याची संधी मिळते. तथापि, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणाले की, को-विनची लस देण्यासाठी सायंकाळी ५ किंवा ६ वाजल्यानंतर परवानगी देत नाही.

अनेक केंद्रांनीही सांगितलं की, ते दिवसा लवकर ड्राइव्ह सुरू करू शकतील आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहू शकतील.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गेल्या आठवड्यात आश्वासन दिलेलं होतं की,  सरकारनं सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ काढून टाकला आहे आणि प्राप्तकर्ते चोवीस तास लस घेऊ शकतात. हा बदल पूर्णपणे अंमलात आला नाही, असं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

एकदा अॅप बंद झाल्यावर प्रशासन लाभार्थी तपासू शकत नाही किंवा डोस देऊ शकत नाही. पालिकेनं दोन शिफ्टमध्ये लसीकरण देण्याचं काम सुरू केलं होतं. जेणेकरून अधिकाधिक लोकांना लस मिळेल. परंतु अॅपच्या निर्बंधामुळे असं करणं शक्य झालं नाही.

नागरी केंद्रांपैकी बीकेसी जंबो हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रामध्ये दररोज सरासरी ४००० नागरिक येतात. सकाळी ६.३० वाजेपासून नागरिक रांगा लावतात. अ‍ॅपनं अनुमती दिल्यास, लसीकरण सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल आणि रात्री १० वाजेपर्यंत चालू राहील. दोन पाळीमुळे दैनंदिन कव्हरेज दुप्पट होऊ शकते, असे हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं.

महानगरपालिकेचे लसीकरण केंद्रे ७० वरून १०० पर्यंत वाढवण्याचं उद्दीष्ट्य आहे. मुंबईच्या केंद्रांनी शनिवारी ६ मार्च रोजी लसीकरण केंद्राची विक्रमी संख्या ३७ हजार ३०९ केली. प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते हे ५० हजारावर वर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा