Advertisement

कोरोनामुक्त रुग्णांना इतर आजारांचा त्रास; सुरक्षेच्या दृष्टीनं ओपीडीकडं धाव

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या संसर्गजन्य आजारातून बरं झाल्यानंतरही काही रुग्णांच्या आरोग्याबाबत तक्रारी कायम आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांना इतर आजारांचा त्रास; सुरक्षेच्या दृष्टीनं ओपीडीकडं धाव
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या संसर्गजन्य आजारातून बरं झाल्यानंतरही काही रुग्णांच्या आरोग्याबाबत तक्रारी कायम आहेत. फुप्फुस आणि रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करणाऱ्या या कोरोनामुळं अनेकांना आरोग्यनिगडीत समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

उच्च क्षमतेच्या उपचारपद्धतीमुळं पित्ताचा त्रास, झोप न लागणं, दम लागणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं, असे त्रास बहुतांश रुग्णांना २ ते ३ महिने जाणवतात. तर, काहींना मूत्रपिंडाचे विकार, मधुमेहाचा त्रास आणि मानसिक विकाराचा सामना करावा लागतो.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना मुंबईतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांत स्थापन वॉर रूमद्वारे संपर्क साधला जातो. या केंद्रांत वरिष्ठ व ज्युनिअर डॉक्टर रुग्णांची विचारपूस व तपासणी करतात. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक रुग्णांनी या ओपीडीमध्ये हजेरी लावली असल्याचं समजतं.

प्रशासन नेहमीच काळजी घेण्याचं आवाहन करतं. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही आरोग्याची तक्रार असलेले नागरिक उपचारांसाठी येत आहेत. त्यांची तपासणी करून योग्य उपचार अथवा मार्गदर्शन केलं जात आहे.

'अशी' घेतली जाते काळजी 

  • महापालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना विभाग कार्यालयातील वॉर रुमद्वारे संपर्क साधला जातो. 
  • कोरोनामुक्त झाल्यानंतरही आरोग्याची तक्रार असलेल्या नागरिकांना नजीकच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये बोलाविण्यात येतं. 
  • काही रुग्णांना लाँग कोविडचा त्रास संभवतो. 
  • मानसिक ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा