Advertisement

औषध विक्रेत्यांना सर्दी, ताप-खोकल्याची औषधं न देण्याच्या सूचना


औषध विक्रेत्यांना सर्दी, ताप-खोकल्याची औषधं न देण्याच्या सूचना
SHARES

कोरोनाची लागण होण्याची सर्दी, ताप, खोकला ही मुख्य लक्षणं आहेत. मात्र, अनेकजण ही लागण झाली असताना जवळच्या औषध दुकानात जाऊन यावरील औषधं घेण्याची शक्यता असून, यामुळं कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे. त्यामुळं औषध विक्रेते- फार्मासिस्ट यांनी ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीवरील औषधे अजिबात विकू नये. जर या औषधांची मागणी कोणी केली तर त्याची माहिती त्वरित मुंबई महानगर पालिकेला द्यावी वा त्यांना नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवावे, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) औषध विक्रेते-फार्मासिस्टला केली आहे.

कोरोनाविरोधातील लढाई दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यात अनेक जण भीतीनं वा कोरोनाग्रस्तांकडे वेगळ्या नजरेनं बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन असल्यानं लक्षणं लपवणाऱ्यांची संख्याही खूप आहे. अशी लक्षणे असली तर कोरोना असेलच असेही नाही. पण अशी लक्षणे असणाऱ्यांना शोधून काढत कोरोनाचा धोका कमी करणे याकडं महापालिकेचा कल आहे.

रुग्ण जर मेडिकलमधून औषधे घेऊन गेली तर त्यांचा धोका वाढेलच, पण इतरांना ही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यावरील औषधं न देता, औषधे मागणाऱ्यांची माहिती पालिकेला कळवावी असं आवाहन औषध विक्रेत्यांना करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा