Advertisement

सांगलीत एकाच कुटुंबात १२ जणांना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा १४७ वर

सांगली जिल्ह्यातील (sangli) इस्लामपुरमध्ये कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे सांगलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ वर, तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या आता १४७ वर जाऊन पोहोचली आहे.

सांगलीत एकाच कुटुंबात १२ जणांना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा १४७ वर
SHARES

सांगली जिल्ह्यातील (sangli) इस्लामपुरमध्ये कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे सांगलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ वर, तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या आता १४७ वर जाऊन पोहोचली आहे.

गंभीर बाब म्हणजे इस्लामपुरात (islampur) आढळलेले कोरोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या कोरोनाबाधित (COVID-19) रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे सांगलीत सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आरोग्य विभागाने तातडीने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

त्यातील समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील १२, पुणे ५,औरंगाबाद १ आणि नागपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

या सर्व रुग्णांना आपापल्या घरी रुग्णवाहिकांमधून घरी सोडण्यात आलं. त्यापूर्वी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर स्टाफने रुग्णाचं मनोबल आणि डॉक्टरांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या. 

आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा