Advertisement

Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०००च्या वर

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १००० च्या वर गेला आहे. त्यामध्ये मुंबईत अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालंय.

Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०००च्या वर
SHARES

राज्यात Coronavirus चा फैलाव वाढत आहे. मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच ११६ रुग्ण दाखल झाले. ठाण्यात २ रुग्ण सापडले. याशिवाय ५ रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्याच्या एकूण आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत आतापर्यंत ५९० रुग्ण दाखल झाले आहेत.


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अधिक

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १००० च्या वर गेली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा १ हजार ०१८ वर पोहोचला आहे. मंगळवारी एका दिवसात १५० रुग्णांची भर पडली. त्यातले ११६ जण मुंबईतलेच आहेत. मुंबईतल्या या ११६ पैकी ५५ रुग्ण आधीच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे मुंबईच्या काही भागात धोका वाढला आहे. आज मुंबईत दाखल असलेल्यांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला. यातले ४ जण इतरही काही आजारांनी ग्रस्त होते आणि १ रुग्ण वयोवृद्ध होता, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.


मुंबईत धोका वाढतोय

मुंबईच्या या काही ठराविक भागात कोरोनाव्हायरसच्या साथीनं तिसरा टप्पा गाठल्याचा संशय आहे. AIIMS च्या संचालकांनी या हॉटस्पॉटमध्ये हा व्हायरस कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं. सध्या मुंबईत ११६, पुण्यात १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ असे मिळून १५० कोरोना पॉझिटिव्ह २४ तासात आढळले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा १०१८ च्या घरात गेला आहे. येत्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.


पुण्यालाही धोका

पुण्यात अवघ्या २ तासांत ३ जणांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर १२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज सकाळी दोन तासातच ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही रुग्णांचे वय हे ६० वर्षांपुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. कोरोनामुळे पुण्यात झालेल्या मृतांचा आकडा आता ८ झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement