Advertisement

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड केंद्रामध्ये आवाजावरून कोरोना चाचणी केली जात असून, या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण
SHARES

गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड केंद्रामध्ये आवाजावरून कोरोना चाचणी केली जात असून, या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नेस्को कोव्हिड सेंटर कोरोना चाचणीचे सुमारे २ हजार नमुने गोळा करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कोरोना चाचणीचा हा पहिलाच प्रयोग आहे. शिवाय, या नमुन्यांचा अभ्यास  करून पुढच्या महिन्यात अहवाल  सादर करण्यात येणार आहे.

इस्राइल कंपनीच्या सहकार्यानं आवाजावरून कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीचा प्रयोग ऑगस्ट महिन्यात सुरू झाला आहे. आवाजावरून करण्यात येणाऱ्या चाचणीसाठी २००० रुग्णांकडून ४ हजार नमुने गोळा करण्यात आल्याची माहिती मिळते. तसंच, आवाजावरून करण्यात येणाऱ्या चाचणीचे देशभरातून १० हजार नमुने जमा करण्यात आले आहेत.

या चाचणीचा अंतिम अहवाल जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. या चाचणीचे सकारात्मक निष्कर्ष दिसून आल्यास महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा स्वरूपाच्या कोरोना चाचण्या सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या माध्यमातून केवळ ३० सेकंदात कोरोना संसर्गाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

या चाचणीसाठी प्रत्येक रुग्णानं २ वेळा आपल्या आवाजाचे नमुने दिले आहेत. यामध्ये पहिला नमुना हा रुग्ण कोरोना केंद्रात दाखल होताना घेतला, तर दुसरा नमुना हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर घेण्यात आला. रुग्णांकडून घेतलेले नमुने व्हॉकेलीस हेल्थ फॉर ॲनलिसिस या केंद्राला पाठविण्यात आले आहेत. याखेरीज, संशयित रुग्णांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा