Advertisement

coronavirus updates: कस्तुरबात घुशी-मांजरी?, हायकोर्टात विनंती अर्ज

कस्तुरबा रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून घुशी, मांजरांचा सर्रास वावर असल्याची तक्रार करत याबाबत न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्याची मागणी करणारा एक विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आला आहे.

coronavirus updates: कस्तुरबात घुशी-मांजरी?, हायकोर्टात विनंती अर्ज
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होत असल्याने प्रशासकीय यंत्रण सर्व तऱ्हेने प्रतिबंधात्मक उपायोजना करत आहे. कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यासाठी जास्तीत जास्त लॅबची उपलब्धता करून देण्यासोबतच कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करण्यासाठी त्यांना मुंबईतील कस्तुरबा (Kasturba hospital) रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र याच रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून घुशी, मांजरांचा सर्रास वावर असल्याची तक्रार करत याबाबत न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्याची मागणी करणारा एक विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आला आहे. 

वकील सागर कुर्सिजा यांनी हा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाला (bombay high court) केला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाली आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्यासाठी सध्या दररोज शेकडो रुग्ण कस्तुरबा रुग्णालयाची वाट धरत आहेत. याच ठिकाणी या साऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्या होत आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही कस्तुरबा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 

कोरोना व्हायरस (COVID - 19) पसरू द्यायचा नसेल, तर वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा आवाहन प्रशासकीय पातळीवरून करण्यात येत असताना खुद्द जिथं कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, त्या कस्तुरबा रुग्णालयातच सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचा आरोप अॅड. कुर्सिजा यांनी आपल्या अर्जात केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात उंदिर, घुशी, मांजरांचा मुक्त संचार असल्याने कोरोना पसरण्याचा धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भातील काही पुरावेही त्यांनी न्यायालयाला सादर केले आहेत. 

एवढंच नाही, तर  कस्तुरबाच्या क्वारंटाइन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्यदायी आहार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यासाठी रुग्णालयाचा डाएट चार्टही त्यांनी न्यायालयाला सादर केला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य कुर्सिजा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्या. नितीन बोरकर यांनी यावर सोमवारी सुनावणी घेण्यात येईल, असं स्पष्ट केलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा