Advertisement

टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका, शास्त्रज्ञांचा दावा


टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका, शास्त्रज्ञांचा दावा
SHARES

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास सर्वच देश कोरोनावर लस शोधत आहेत. यासोबतच अनेक शास्त्रज्ञ कोरोनावर रिसर्च करत आहेत. आता एका रिसर्चमध्ये टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा दावा करण्यात आला आहे.

मेट्रो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे. स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ४१ कोरोना रूग्णांवरील संशोधनात असं दिसून आलं आहे की, त्यापैकी ७१ टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, १२२ कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील ७९ टक्के रुग्णांना टक्कल असल्याचं निष्पण्ण झालं.

जानेवारीत चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा प्रकारच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत केलेल्या या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांच्या म्हणण्यानुसार, “पुरुषांमधील टक्कल हे कोव्हिड-19 च्या (COVID-19) गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक आहे”.

संशोधकांचा असा दावा आहे की पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात. यापूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं म्हटलं गेलं आहे की, पुरुषांच्या रक्तात अशा रेणूंची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, जी सहजपणे कोरोना विषाणूचे वाहक बनतात.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा