Advertisement

भाजपाचं मोफत आरोग्य शिबीर


भाजपाचं मोफत आरोग्य शिबीर
SHARES

धारावी - मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत भाजपानं प्रभाग क्रमांक 185 मध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या  शिबिराचं उद्घाटन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. सांधेदुखी, रक्तदाब, डायबिटीस, हृदयविकार, किडनी अशा विविध आजारांनी त्रस्त रुग्णांनी या शिबिरास भेट दिली. कौशल्य चॅरिटेबल ट्रस्टच्या तीन निष्णात डॉक्टरांसह अनेक मदतनिसांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. या वेळी आशिष शेलार यांनी डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णांचीही विचारणा केली. मुंबई भाजपा मंत्री तमी शेख, माजी नगरसेवक गोवर्धन चौहान, प्रभाग अध्यक्ष राजेश कुंभकर आदीही या वेळी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा