Advertisement

महाराष्ट्र कोविड टास्कची ज्येष्ठ नागरिकांना घरी देऊन लस देण्याची शिफारस

वाढते रुग्ण पाहता ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्र कोविड टास्कची ज्येष्ठ नागरिकांना घरी देऊन लस देण्याची शिफारस
SHARES

COVID 19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोविड लस देण्याची मोगीम देखील सुरू झाली आहे. पण वाढते रुग्ण पाहता ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. खास करून अशा ज्येष्ठांना जे प्रकृतीच्या कारणास्तव घराबाहेर पडू नाही शकत.  

हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र कॉव्हिड टास्क फोर्सनं वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी, बेडवरून उठू न शकणाऱ्या आणि गंभीर आजारानं ग्रस्त अशांसाठी घरी जाऊन लस देण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे.

तथापि, केंद्राच्या लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार घरात लोकांना लसी देण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही, तथापि तज्ञांना वाटते की ही कल्पना तार्किक असेल.

“वृद्धापकाळात राहणाऱ्या आणि केअर होममधील ज्येष्ठांना अधिक धोका संभवतो. त्यामुळे घरी जाऊन लस दिली पाहिजे. शिवाय अनेक वृद्धांची लसीकरण केंद्रांपर्यंत येण्याची खेप वाचेल. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावर आणण्साठी स्वयंसेवकांची गरज भासते. कोरोना काळात स्वयंसेवकांची सोय करणं कठिण आहे,” असं फोर्टिस हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअरचे संचालक डॉ. राहुल पंडित यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितलं.

“असेही काही नागरिक आहेत ज्यांचं कुटुंब नाही. ते एकटे राहतात. अपंगत्व असणाऱ्यांना देखील लस केंद्रावर जाऊन घेणं शक्य नाही. असे नागरिक त्यांच्या कुटुंबावर अवलंबुन असतात., ”असं डॉ. पंडित यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत लसीकरणासाठी डायलिसिस सेंटर वापरण्याची शिफारस केली आहे.

ते म्हणाले, “मुंबईत लसीकरण केंद्रांमध्ये तुलनेने गर्दी असल्यानं डायलिसिस रूग्णांना चालता येणं शक्य नाही. कारण रोगप्रतिकार शक्ती कमी आहे आणि जास्त काळ रांगेत उभे राहण्याची शक्ती कमी आहे.”



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा