Advertisement

भारतातलं पाहिलं 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र मुंबईत!


SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. यामुळं मुंबईत ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अशातच महापालिकेच्या जी उत्तर विभागात 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण या केंद्रावर होत आहे.

'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र हे भारतातील पाहिलं केंद्र असून मुंबईत प्रथम सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात वाहनांनमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. हे केंद्र सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

सद्यस्थितीत या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागात असलेल्या कोहिनुर वाहनतळात सुरू करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा