Advertisement

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३ दिवसांवर

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ३३ दिवसांवर पोहोचला आहे.

दिलासादायक!  मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३ दिवसांवर
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता ६४ हजारांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ३३ दिवसांवर पोहोचला आहे. गुरूवारी हा कालावधी ३ दिवसांवर होता.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १ जूनला १८ दिवस तर १० जूनला २५ होता. मुंबईतील रुग्णवाढीचा रोजचा सरासरी दरही कमी झाला आहे. हा दर शुक्रवारी २.१५ टक्क्यांवर आला आहे. गुरूवारपर्यंत रोज २.३० टक्के रुग्णवाढ होत होती. १ जूनला रुग्णवाढीचा रोजचा सरासरी दर ३.८५ टक्के तर १० जूनला २.८२ टक्के होता.

एच पूर्वने (वांद्रे पूर्व, खार ) विभागात  रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून  तब्बल ६९ दिवसांवर गेला आहे. तर या विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दर फक्त १ टक्के इतका सर्वात कमी आहे.

ई (भायखळा) विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवस रूग्ण वाढीचा सरासरी दर १.१ टक्के आहे. एफ उत्तर (माटुंगा) मध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६४ दिवस आणि रूग्ण वाढीचा सरासरी दर १.२ टक्के आहे. एम पूर्व (चेंबुर पूर्व) मधील कालावधी ५४ दिवस तर एल (कुर्ला) मधील ५३ दिवस आहे. दोन्ही विभागात रोजची रुग्णवाढ प्रत्येकी १.३ टक्के आहे.

४० दिवसांपेक्षा जास्त कालावधी असलेले विभाग
  • बी ( मशिद बंदर) - रुग्ण दुपटीचा कालावधी ४९, रूग्णवाढीची टक्केवारी  १.४ टक्के
  • जी दक्षिण (वरळी) - रुग्ण दुपटीचा कालावधी ४8, रूग्णवाढीची टक्केवारी  १.५ टक्के
  • जी उत्तर (धारावी, माहिम, दादर) -  रुग्ण दुपटीचा कालावधी ४४, रूग्णवाढीची टक्केवारी  १.६ टक्के
  • ए (कुलाबा) - रुग्ण दुपटीचा कालावधी ४३,रूग्णवाढीची टक्केवारी. १.६ टक्के

हेही वाचा -

'असे' आहेत मुंबईतील कंटेन्मेंट झोन

मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा