बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) आकडेवारीनुसार यावर्षी पावसाळ्याशी संबंधित आजारांमध्ये विशेषत: मलेरिया आणि चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, तर डेंग्यू आणि अनेक साथीच्या आजारांमध्ये 2024 च्या तुलनेत घट झाली आहे.
आकडेवारीनुसार, 2025 मध्ये शहरात मलेरियाच्या (malaria) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. जानेवारी ते 15 सप्टेंबर दरम्यान मुंबईत (mumbai) 6,277 रुग्णांची नोंद झाली.
गेल्या वर्षी याच कालावधीत 5,182 रुग्ण होते. ऑगस्टमध्ये ही वाढ सर्वाधिक दिसून आली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 4,021 रुग्ण होते तर यावर्षी 5,706 रुग्ण आढळले.
चिकनगुनियामध्येही (chikunguniya) वाढ झाली आहे, या वर्षी आतापर्यंत 542 रुग्ण आढळले आहेत, तर 2024 च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 366 रुग्ण आढळले आहेत, असे इंडियन एक्सप्रेसने आकडेवारीचा हवाला देत वृत्त दिले आहे.
दुसरीकडे, डेंग्यूच्या (dengue) एकूण रुग्णसंख्येत घट दिसून आली, या वर्षी 15 सप्टेंबरपर्यंत 2,724 रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या 3,435 रुग्णसंख्येपेक्षा कमी आहे.
पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे रुग्णांचा आकडा गेल्या वर्षीच्या 6,599 वरून यावर्षी 5,989 पर्यंत घसरला आहे, तसेच फक्त ऑगस्टमध्ये 6,133 वरून हा आकडा 5,774 पर्यंत घसरला आहे.
तथापि, हिपॅटायटीसमध्ये थोडीशी वाढ झाली 2025 मध्ये आतापर्यंत 913 प्रकरणे नोंदवली गेली, 2024 मध्ये याच कालावधीत 791 प्रकरणे नोंदवली गेली होती.
मुंबई महापालिकेच्या (bmc) आरोग्य पथकांनी सप्टेंबरमध्ये घरोघरी जाऊन तापाचे सर्वेक्षण केले, 4.7 लाख घरांमधील 22 लाखांहून अधिक रहिवाशांची तपासणी केली. डासांची पैदास रोखण्यासाठी कीटक नियंत्रण मोहिमा तीव्र करण्यात आल्या, तर रुग्णालयांनी संसर्गाचे धोके कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या.
आरोग्य तज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले की पूर, साचलेले पाणी, आर्द्रता आणि गर्दी यासारख्या पावसाळी परिस्थितीमुळे अनेकदा हंगामी आजार उद्भवतात.
पावसाळ्याशी संबंधित आजारांचा प्रसार रोखण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांना साचलेले पाणी काढून टाकण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा