Advertisement

बनावट लसीकरणापासून 'असा' करा बचाव, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

खरी आणि बनावट लस यातील फरक कसा ओळखता येईल? लसीकरण प्रमाणपत्र कसे तपासायचे? जगभरात लसीकरणाच्या नावाखाली कशाप्रकारे फसवणूक होत आहे? जाणून घेऊया.

बनावट लसीकरणापासून 'असा' करा बचाव, 'या' गोष्टी ठेवा लक्षात
SHARES

बनावट लसीकरणाला (Vaccination Drive) देशात उत आला आहे. ३० मे रोजी मुंबईच्या (mumbai) कांदिवली (Kandivli) भागात हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं.

यात 390 लोकांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कुणालाही लसीकरणानंतरची लक्षणं दिसली नाहीत तेव्हा ही फसवणूक (Fraud) झाल्याचं उघडकीस आलं.

खरी आणि बनावट लस यातील फरक कसा ओळखता येईल? लसीकरण प्रमाणपत्र कसे तपासायचे? जगभरात लसीकरणाच्या नावाखाली कशाप्रकारे फसवणूक होत आहे? जाणून घेऊया.


‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • केवळ कोविन अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करा.
  • भारत सरकारनं लसीकरणासाठी कोविनवर सर्व सुविधा दिल्या आहेत. इतर कोणतेही अ‍ॅप किंवा वेबसाइट उघडू नका किंवा आपली कोणतीही माहिती देऊ नका.
  • नोंदणीच्या वेळी आपला मोबाइल नंबर द्या. जर आपल्याला कोविनशी संबंधित कोणतंही ओटीपी आल्यास ते कोणासोबतही शेअर करू नका.
  • नोंदणी केल्यानंतर जेव्हा आपण स्लॉट बुक कराल तेव्हा देखील आपल्याला ओटीपी मिळेल. हा ओटीपी लस घेण्यापूर्वी आरोग्य कर्मचार्‍यांना सांगावा लागेल.
  • आपण कोविन पोर्टलवर एका मोबाइल नंबरवरून ४ लोकांची नोंदणी करू शकता. हे लक्षात ठेवा की आपल्या मोबाइलवरुन ओळखीच्या लोकांचीच नोंदणी करा.
  • लसीकरणासाठी फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच जा. जर आपण एखाद्या खासगी केंद्रात जात असाल तर प्रथम ते अधिकृत आहे की नाही ते शोधा.
  • कोविन पोर्टलवर खासगी लस केंद्रे देखील आहेत. आपण कोविन पोर्टल किंवा अ‍ॅपमधूनच खासगी केंद्रांवर स्लॉट बुक करू शकता.
  • लस नोंदणीसाठी मेसेज पाठवला जातो, ज्यात एक लिंक असते. या लिंकवर क्लिक करून, आपल्या फोनमध्ये आणखी एक अ‍ॅप डाउनलोड होते. या अ‍ॅपचा वापर आपली माहिती चोरण्यासाठी केला जात आहे.


लस प्रमाणपत्र कसे तपासायचे?

  • लसीकरणाच्या प्रमाणपत्रात एक क्यूआर कोड असतो, ते स्कॅन करून आपण प्रमाणपत्र खरे आहे की बनावट आहे ते तपासू शकता.
  • यासह, प्रमाणपत्रावर आपले नाव, वय, लसीकरणाची तारीख आणि वेळ, लसीकरण केंद्राचं नाव आणि ज्या आरोग्य कर्मचा-यानं आपल्याला लस दिली त्याचं नाव अशी संपूर्ण माहिती असते. या माहितीमध्ये काही चूक किंवा त्रुटी असल्यास त्वरित तक्रार करा.
  • लस घेतल्यानंतर 5 मिनिटांतच आपल्याला कन्फर्मेशन मेसेज येतो आणि एका तासाच्या आत प्रमाणपत्रही कोविन पोर्टलवर येतं.



हेही वाचा

नवी मुंबईतही बोगस लसीकरण, तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवारपासून लसीकरण सुरळीत; केंद्राकडून साठा उपलब्ध होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा