Advertisement

'या' रुग्णालयाने बाल रुग्णांसाठी सुरू केली शाळा!


'या' रुग्णालयाने बाल रुग्णांसाठी सुरू केली शाळा!
SHARES

छोट्या रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांना शाळेत जाता येत नाही, अशा रुग्णांसाठी कोकीलाबेन धीरुबाई अंबानी या रुग्णालयानं एक शाळा सुरू केली आहे.

ह्रदयरोग, कॅन्सर आणि ऑर्थोपेडिक या आजाराने ग्रस्त असलेल्या बाल रुग्णांना अनेकदा शाळा बुडवून उपचारांसाठी रुग्णालयात यावं लागतं. यामुळे त्यांचं शाळेसोबत असणारं नातं शिवाय अभ्यास या दोघांमध्ये खूप अंतर निर्माण होतं. ही बाब लक्षात घेऊनच कोकीलाबेन रुग्णालयानं उपचारांसोबतच बाल रुग्णांना शाळेची शिकवण द्यायचा निर्णय घेतला. अनेकदा खूप दिवसानंतर शाळेत जाणं ही अशा मुलांसाठी कठीण होतं.



या मुलांसाठी विशेष शिक्षक

या शाळेत मुलांसाठी विशेष शिक्षक नेमण्यात आले आहेत. जे दरदिवशी केजी ते दहावी पर्यंतच्या मुलांना 2 तास इंग्रजी, हिंदी या विषयांचं शिक्षण देतात. शिकवल्यानंतर या मुलांची परीक्षा देखील घेतली जाते. शिक्षक या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना गृहपाठ देखील देतात. प्रत्येक मुलासाठी एक वर्कशीटदेखील तयार करण्यात आली आहे.


रुग्णालयात शाळेचं वातावरण निर्माण करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. मुलं पालकांसोबत येतात आणि नेहमी उपचारांसाठी पर्यवेक्षणाखाली असतात. त्यामुळे या शाळेच्या माध्यमातून आम्ही मुलांसह आणि आई-वडिलांनाही मार्गदर्शन करतो. पश्चिम भारतात ही एक प्रसिद्ध संकल्पना आहे. पण, आम्ही ही भारतात सुरू केली आहे.

- डॉ. प्रज्ञा गाडगीळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा