Advertisement

स्मार्टफोन जास्त काळ वापरताय? मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता ४०० पट अधिक


स्मार्टफोन जास्त काळ वापरताय? मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता ४०० पट अधिक
SHARES

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोनचं जणू वेड लागलं आहे. पण, याच स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता १००% नव्हे तर तब्बल ४०० टक्क्यांनी वाढली आहे, असा अहवाल आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांनी केंद्र सरकारला दिला आहे.

मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी याबाबत अहवाल केंद्र सरकारला दिला आहे. याचबरोबर यामुळे तरुणांना सर्वाधिक धोका असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.जास्त काळ स्मार्ट फोन वापरणं धोकादायक

या अहवालात दिवसाला अर्ध्यातासाहून अधिक काळ स्मार्ट फोन वापरणं धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. स्मार्ट फोनमधून बाहेर पडणाऱ्या फ्री रेडीकल्समुळे मानवी शरीरावर परिणाम होतो. पुरुषांच्या जननक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे, दिवसाला अर्ध्यातासाहून अधिक काळ स्मार्ट फोन वापरणं धोकादायक ठरू शकतं.


लहान मुलांना स्मार्ट फोन देऊच नये

लहान मुलांना कशात तरी व्यस्त ठेवायचं म्हणून आई-वडिल सहज त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

लहान मुलांची कवटी नाजूक असल्यानं स्मार्ट फोनच्या रेडिएशनचा मोठा धोका त्यांना होऊ शकतो. या रेडिएशनचा परिणाम प्राणी आणि वनस्पतींवरही होत आहे. मानवी डीएनएसाठी हे रेडिएशन घातक असून त्यामुळे निद्रानाश, पार्कींन्सन, अल्झायमर या आजारांचीही शक्यता बळावते.


छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर

ऑनलाईन व्यवहार ते रेल्वे तिकिटापर्यंत सर्वच गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होतात. सोशल मीडिया, गेम्स, सिनेमा, गाणी या सगळ्याचा आनंद अगदी सहज घेता येतो. पण जर कर्करोगापासून वाचायचं असल्यास स्वत:वर थोडं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.


कसं ठेवाल नियंत्रण?

  • जिथे स्मार्ट फोन वापरण्याची गरज नाही तिथं तो टाळा
  • रोज थोडाफार व्यायाम करा
  • सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करा
  • लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन अजिबात देऊ नका
  • शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्ट फोनपासून परावृत्त करा
  • पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्ट फोनचा वापर टाळावा


आयआयटी मुंबईने २०१० मध्ये एक सर्वे‌ केला होता. त्यात ५ हजार ११७ कर्करोग रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी ५० टक्के रुग्णांना रेडिएशनमुळे मेंदूचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं होतं. हा सर्वे २०११ मध्ये पूर्ण झाला होता.

एका महिन्यात फक्त २ तास स्मार्ट फोनवर बोलणं चालू शकतं. पण, दिवसाला जर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बोललात तर पुढच्या १० वर्षांत मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही अशा प्रकारचा अहवाल दिला होता. २०१४ मध्येही आयआयटीच्या तज्ज्ञांनी एक अहवाल तयार केला होता.


माणसाच्या शरीराचं नॉर्मल तापमान हे ९९% एवढं असतं. पण, मोबाईल वर जास्त काळ बोलल्यामुळे ते १००.२% एवढं होतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि भा‌रतात या कर्करोगाच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे.
- गिरीश कुमार, इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिपार्टमेंट, आयआयटी मुंबई, पवई


मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूच्या नसांवर परिणाम होऊ शकतो
  • स्मरणशक्ती कमी होऊ‌ शकते
  • महिलांच्या मासिक पाळीवरही याचा परिणाम होऊ‌ शकतो
  • कानाचा कर्करोग होऊ शकतो


२०१४ मध्ये कर्करोगाचे एकूण १० लाख रुग्ण आढळले होते. २०१५ मध्ये ११ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यातील ३लाख धूम्रपान आणि ८ लाख मोबाईलमुळे झालेल्या कर्करोगाचे रुग्ण होते. तर, २०१६ मध्ये रुग्णांची संख्या १४ लाख एवढी झाली आहे. पुढच्या ५ वर्षात भारतात कर्करोग रुग्णांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती देखील गिरीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा