Advertisement

Maharashtra Budget 2022 : आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार

येत्या ३ वर्षांत आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे.

Maharashtra Budget 2022 : आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार
SHARES

महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३ हा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधींची तरतूद केली जात आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी ११ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

येत्या ३ वर्षांत आरोग्य सेवांवर  ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये तरतुद करण्यात आली. आवर्ती खर्चासाठी १८ कोटींच्या निधीची तरतुद केली आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येणार असल्याचं या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलं.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गुरूवारी विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदी

  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार
  • नाशिक नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार
  • पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा