Advertisement

प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी केलं प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’ प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ई-उद्घाटन झालं. हे जगातील सगळ्यात मोठं प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्र असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांनी केलं प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन
SHARES

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’ प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ई-उद्घाटन झालं. हे जगातील सगळ्यात मोठं प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्र असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सोमवारी एकाचवेळी ५०० रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीचे दोन डोस देण्यात आले. या रुग्णांवर आढळून आलेल्या परिणामानंतर राज्यभरातील गंभीर कोरोना रुग्णांवर ही थेरपी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने ७५ कोटींचा अतिरिक्त निधी निश्चित केला आहे. या थेरपीचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

पाठपुराव्याला यश 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर केंद्राकडे प्लाझ्मा थेरपीच्या परवानगीसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्याला यश आलं आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

प्लाझ्मा दान

सध्याच्या घडीला कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार कोरोनाबाधितांना काही विशेष औषधे दिली जात आहेत. तर लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात. पण, इथं प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देत आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे, त्यांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाकेले पाहिजे. प्लाझ्मा वेळेत देता आल्याने १० पैकी ९ रुग्ण आपण बरे करू शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावर विचार व्हावा, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. 

२३ ठिकाणी सोय

महाराष्ट्रात २३ ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. यापैकी १७ ठिकाणी कोविड रुग्णांसाठी ही उपचार पद्धती सुरु आहे. पूर्णपणे बरा झालेला रुग्ण http://plasmayoddha.in वर आपली प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा- प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे ११ रुग्ण बरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा