Advertisement

राज्यातील रिकव्हरी रेट ९२. ४४ टक्क्यांवर


राज्यातील रिकव्हरी रेट ९२. ४४ टक्क्यांवर
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णसंख्येतही लक्षणीय घट होत  असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्यावर आहे. हा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. मात्र, दिवाळीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानंही जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात ४ हजार ४९६ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा १७ लाख ३६ हजार ३२९ इतका झाला आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा अजूनही कमी होत नसल्यानं थोडी चिंता कायम आहे. राज्यात १२२ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ६४ हजार २७५ चाचण्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात ७ हजार ८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ०५ हजार ०५६ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के इतके झाले आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एक लाखांहून कमी झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत ८४ हजार ६२७ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, राज्यात ८ लाख ११ हजार ०३५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा