Advertisement

कर्करोगाच्या उपचारांसाठी मर्क फाऊंडेशन, टाटा सेंटरचा करार


कर्करोगाच्या उपचारांसाठी मर्क फाऊंडेशन, टाटा सेंटरचा करार
SHARES

आफ्रिकेत कर्करोगावर उपचार करण्यासाठी मर्क फाऊंडेशन आणि टाटा मेमोरिअल सेंटरचा करार करण्यात आला आहे. भारताशी भागीदारी करून आफ्रिका आणि आशिया यांच्यात नाळ जोडण्याचा मर्क फाऊंडेशनचा प्रयत्न असणार आहे. या भागीदारीतून आफ्रिकन खंडात कर्करोग चिकित्सा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून आफ्रिकन डॉक्टरांना मर्क फाऊंडेशनतर्फे एक वर्षीय ऑन्कोलॉजी फेलोशिप प्रशिक्षण सुविधा देण्यात येणार आहे. मर्क फाऊंडेशन ही मर्क केजीएए जर्मनी या कंपनीची संस्था असून या संस्थेने मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर या मुंबईतील अत्याधुनिक आणि अग्रेसर कर्करोग चिकित्सा केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. आफ्रिकेतील उमेदवार डॉक्टरांना फेलोशीप अभ्यासक्रम पुरवण्याच्या हेतूने हा करार करण्यात आला आहे.


मर्क फाऊंडेशनच्या मर्क कॅन्सर अॅक्सेस प्रोग्राम या उपक्रमाचा एक भाग आहे. आफ्रिकेतील ऑन्कोल़ॉजिस्ट डॉक्टरांच्या मर्यादित संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने मर्क फाऊंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.


नव्याने स्थापन झालेल्या मर्क फाऊंडेशनच्या छताखाली टाटा मेमोरियल सेंटरशी असलेली भागीदारी अधिकृत करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमची भागीदारी २൦१६ मध्ये सुरू केली असून गेल्या दोन वर्षात आफ्रिकेतील ३൦ हून अधिक डॉक्टरांना ऑन्कोलॉजी विषयातील एक वर्षाची फेलोशीप टाटा मेमोरियल सेंटरमध्येच देऊ केली आहे. भारतासह आम्ही केलेली भागीदारी दीर्घकाळ टिकणारी असून आफ्रिका आणि आशिया खंडात या भागीदारीची महत्त्वपूर्ण भूमिका ठरेल, अशी खात्री आहे.’’

- डॉ. राशा केलेज, सीईओ, मर्क फाऊंडेशन  


आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये कर्करोग निवारण आणि चिकित्सा क्षमता विकसित करण्यासाठी मर्क फाउंडेशनला मदत करताना त्यांच्याशी भागीदारी केल्याचा आनंद होत आहे. या देशांमध्ये कर्करोगाचा प्रतिबंध, निदान आणि उपचार करण्यासाठी या भागीदारीमुळे इथल्या अकादमी क्षेत्राला नक्कीच मदत होईल.
- प्रा. के. एस. शर्मा, संचालक, टाटा मेमोरियल सेंटर अकादमी विभाग  

 

'पंजाब, यूपी, आंध्रप्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांतही कर्करोग चिकित्सा केंद्रे प्रस्थापित करण्याची आमची योजना आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांतल्या डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ मंडळींना टीएमसीतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा