शाळेवर मोबाइल टॉवर


  • शाळेवर मोबाइल टॉवर
SHARE

बोरीवली - आयसी कॉलनी येथील नारायण शाळेच्या छतावर मोबाइलचे टॉवर लावले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामथ यांना पत्र लिहलंय. मीरा कामथ यांनी जेव्हा आरटीआय अंतर्गत अहवाल मागवला तेव्हा मात्र या अहवालात टॉवर लावण्याची परवानगीच दिली नसल्याचं समोर आलंय.

मीरा कामथ यांनी सांगितलं की, मोबाइल टॉवर शाळा आणि रुग्णालयात 300 मीटरपर्यंतच्या परिसरात लावण्यास बंदी आहे. यामुळे कॅन्सरसारखा घातक आजार होऊ शकतो. तर शाळेच्या व्यवस्थापनाचं म्हणण आहे की, ही जागा 30 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली असून भाडेतत्वावर घेण्यापूर्वीच हा टॉवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने देखील आवाज उठवला होता. पण आतातरी प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या