Advertisement

मुंबईला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा


मुंबईला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण कडक उन पडत असलं तरी मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे. तलाव क्षेत्रात पुरेसा जलसाठा असल्याने यंदा नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेपर्यंत पुरेल एवढा साठा आहे. 

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा ७ धरणांमधून हा पाणीपुरवठा होत असतो. गतवर्षी मुंबईकरांना काही काळ पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु, गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळं तलावांमध्ये मुबलक जलसाठा जमा झाला.

गतवर्षी मे महिन्यात जेमतेम १५ ते १८ टक्के जलसाठा तलावांमध्ये होता. मात्र यावर्षी आणखी ३ महिने म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्यानं यावर्षी पाणीकपात करण्याची वेळ पालिकेवर येणार नाही.

मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यापैकी सुमारे ९०० दशलक्ष लीटर चोरी तसेच गळतीमुळे वाया जाते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा