Advertisement

एचआयव्ही वायरल लोड चाचणीसाठी 'नॅको' आणि 'मेट्रोपोलीस' हेल्थकेअर एकत्र


एचआयव्ही वायरल लोड चाचणीसाठी 'नॅको' आणि 'मेट्रोपोलीस' हेल्थकेअर एकत्र
SHARES

एचआयव्हीबाधित रुग्णांचं आरोग्य चांगलं राहावं, आणि त्यांना एचआयव्ही व्हायरस लोड चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल एड्स कंट्रोलर ऑर्गनायझेशन (नॅको) यांनी मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेडशी नुकताच करार केला आहे.

या कराराद्वारे देशभरातील ५२५ अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रात औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. ज्यामुळे देशभरात एचआयव्हीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन येण्यास मदत होईल.


एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाल्याचं निदान झाली की, तो वाढू नये म्हणून रुग्णांना रक्तातील विषाणूंची संख्या व्हायरल लोड मोजण्यासाठी दर सहा महिन्यांनी मशिनद्वारे चाचणी करावी लागते. कारण, एचआयव्हीचा विषाणू शक्तीशाली असल्यानं संसर्गाचं प्रमाण वाढल्यास रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. ही सुविधा मोजक्याच एआरटी केंद्रात उपलब्ध आहे.

या पार्श्वभूमीवर आता एड्सग्रस्त रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने नॅको या संस्थेनं मेट्रोपोलीस हेल्थकेअरशी करार केला आहे. त्यानुसार, आता देशभरातील एआरटी केंद्रात उपचार सुरू असलेल्या सर्व एचआयव्ही बाधितांच्या रक्तातील विषाणूंचं (व्हायरल लोड) प्रमाण तपासलं जात आहे. पीपीपी तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ८ फेब्रुवारी २൦१८ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.


२൦൦൦ मध्ये एचआयव्हीचा प्रभाव ६७ टक्के होता. तर, २൦൦७ मध्ये एचआयव्हीने जीव गमावणाऱ्यांची संख्या ५४ टक्के इतकी होती. २൦३൦ पर्यंत एड्सचं समुळउच्चाटन करण्याच्या उद्दिष्टात व्हायरस लोड टेस्टींग हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

- डॉ. नरेश गोएल, डेप्युटी डायरेक्टर जनरल, नॅको

या प्रक्रियेत वापरण्यात येणारे किट्स यूएस एफडीए संमत, आयव्हीडी आणि रोशेद्वारे पुरवण्यात येत आहे.

१९८५ मध्ये एचआयव्ही चाचणीसाठी सुरू करण्यासाठी आलेली ही आमची पहिली लॅब आहे. २൦൦५ पासून आम्ही एचआयव्ही व्हायरस लोड चाचणी करतो आहे. या भागीदारीमुळे एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पाडायला मदत होईल.

- डॉ. सुशील शहा, संस्थापक - अध्यक्ष, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड


एचआयव्ही - १ व्हायरल लोड म्हणजे काय?

एचआयव्ही व्हायरस लोड टेस्टींग रक्तातील एचआयव्ही जेनेटीक मटेरिअल (आरएनए)चं प्रमाण मोजतं आणि विषाणूंचं प्रमाण किती आहे? याचा रिपोर्ट देतो. बाधित व्यक्तीमध्ये एड्सची जोखीम कमी करायची याचा पुरावा हा व्हायरस लोड देतो. तसंच, त्यामुळे प्रकृती देखील दीर्घ काळासाठी सुधारते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा