Advertisement

नाकावाटे घेता येणार लस, 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 'या' तारखेपासून उपलब्ध

सुईविरहित लशीमुळे लस घेणे आणखी सोयीचे ठरणार आहे

नाकावाटे घेता येणार लस, 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 'या' तारखेपासून उपलब्ध
SHARES

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड 19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत इनकोव्हॅक लसीचा समावेश करण्यात आला आहे. नाकावाटे ही लस देण्यात येते. याचे लसीकरण 22 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले होते. परंतु कोविन पोर्टलवर लस अपलोड करताना तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण सुरू झाले नाही.

भारत बायोटेक कंपनीच्या ‘इनकोव्हॅक’ लशीचे केवळ आठ थेंब पुरेसे असून, २८ दिवसांनी पुन्हा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. सुईविरहित लशीमुळे लस घेणे आणखी सोयीचे ठरणार आहेच; शिवाय सुईमुळे काही वेळा अनपेक्षितपणे होणारे त्रासदेखील टाळता येणार असल्याचा दिलासाही मिळणार आहे.

अठरा वर्षांवरील व्यक्तींसाठी ‘इनकोव्हॅक’ लशीचा डोस हा ०.५ एमएलचा असून, केवळ आठ थेंबांमध्ये एकावेळचा डोस पूर्ण होणार आहे. या डोसमध्ये एका नाकपुडीत चार थेंब, तर दुसऱ्या नाकपुडीत चार थेंब घ्यावे लागतील. त्यासाठी प्रत्येकवेळी लस देताना ड्रॉपर मात्र बदलावे लागणार आहे.

विशेष म्हणजे नाकातून लस देण्यासाठी तज्ज्ञ किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचीही गरज लागणार नसल्याचे समजते.

तसेच यापूर्वी कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना बुस्टर मात्रा म्हणूनही ही लस घेता येईल. यासाठी कंपनीने तीन निरनिराळ्या चाचण्या घेतल्या होत्या. सुमारे चार हजार स्वयंसेवकांवर त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी कुणामध्येही आरोग्यविषयक गुंतागुंत उद्भवली नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा