Advertisement

दिलासादायक! जूनपासून प्रत्येक महिन्याला कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा मिळणार

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला कोविशिल्ड लसीच्या दीड कोटी मात्रा देण्याचे मान्य केले आहे.

दिलासादायक! जूनपासून प्रत्येक महिन्याला कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा मिळणार
SHARES

राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला कोविशिल्ड लसीच्या दीड कोटी मात्रा देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार येत्या जून महिन्यापासून कोविशिल्डचा पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीनं बुधवारी मंत्रिमंडळाला कोरोनाची सद्यस्थिती, रुग्णसंख्या आणि लसीकरण यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी सीरमकडून पुढील महिन्यापासून कोविशिल्डच्या दीड कोटी मात्रा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.

रशियानं विकसित केलेली स्पुटनिक ही कोरोना प्रतिबंधित लस विकत घेण्याची तयारी राज्य सरकारनं ठेवली असली तरीही या लसीच्या दराबाबत केंद्र सरकार चर्चा करून निर्णय घेणार आहे. दर निश्चितीचा अधिकार राज्य सरकारला नाही. त्यामुळं स्पुटनिकचा दर ठरत नाही तोपर्यंत राज्याला ती लस खरेदी करता येणार नाही, असे सादरीकरणावेळी स्पष्ट करण्यात आले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा