Advertisement

कॅन्सरसाठी डॉक्टरांना ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरिअल सिरीज


कॅन्सरसाठी डॉक्टरांना ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरिअल सिरीज
SHARES

देशात सध्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. त्यात सर्वसामान्य म्हणजेच लहान मुलांपासून सर्वांना होणाऱ्या 'मुखकर्करोगा' (ओरल कॅन्सर)चं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल तसंच डिजिटल पार्टनरशीपच्या माध्यमातून खास डॉक्टरांसाठी ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरिअल सिरीजचं लॉन्चिंग करण्यात आलं. शुक्रवारी या ट्युटोरियल सिरीजचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं.

या सिरीजचा उपयोग पीएमसीमध्ये काम करणारे मेडिकल ऑफिसर, सिव्हील रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स यांना होणार आहे. 'ओरल कॅन्सर'चं व्यवस्थितपणे निदान करण्यात आलं पाहिजे, यासाठी ही ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरिअल सिरीज असणार आहे.

लेक्चर सिरीज पाहिल्यानंतर डॉक्टरांना काही प्रश्नावलींची उत्तरं द्यायची आहेत. त्यातून त्यांना प्रशिक्षण मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.



१ डिसेंबरला या सिरीजची सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या ड्राईव्हद्वारे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचं डॉ. दिपक सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.


ड्राईव्हमध्ये 'यांचा' समावेश

'आशा वर्कर' तंबाखू खाणाऱ्यांना प्रमुख केंद्रावर घेऊन येतील. तेथे डाॅक्टर त्यांचं निदान करून रुग्णांवर उपचार करतील. शिवाय, डेंटल सर्जनही या ड्राईव्हमध्ये त्यांना मदत करतील. शहरी भागातील डेंटल असोसिएशन ऑफ इंडिया, लायन्स, रोटरी क्लब आणि आयएमए यांचा या ड्राईव्हमध्ये समावेश असणार आहे.

हा अभ्यास चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतवैद्यक आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी आहे. जे कर्करोगतज्ज्ञ नसतात पण, कर्करोगाचं लवकर शोध आणि निदान करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशा तज्ज्ञांचा यांत समावेश आहे.


ट्युटोरियल सिरीजचा हेतू काय?

भारत सरकारच्या सहकार्याने 'अफाॅर्डेबल कॅन्सर केअर' या प्रकल्पाअंतर्गत हे ट्युटोरिअल सुरू करण्यात येणार आहे. हे ऑनलाईन ट्युटोरिअल सुरू करण्याचा मुख्य हेतू म्हणजे कॅन्सरच्या प्रकरणांची माहिती शोधणं, त्याचं निदान करणं आणि त्यांचा अहवाल सादर करणं. संपूर्ण देशातील डॉक्टरांना प्रशिक्षित करुन तत्काळ आणि वेळेत निदान करुन कॅन्सरला प्रतिबंध करण्याचा हेतू यामागे आहे.


डॉक्टरांनी कॅन्सरचं स्क्रिनिंग, निदान आणि उपचाराबद्दल जागरुकता याबद्दल माहिती दिली तर महाराष्ट्रातील बहुतांश १ लाखांंहून अधिक कॅन्सरचे रुग्ण आधीच्या स्टेजवर रुग्णालयात पोहचू शकतील. त्यामुळे कर्करोगाचं प्रमाण कमी होऊ शकतं.  

- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा