धारावीत उघड्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न

 Dadar
धारावीत उघड्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न
धारावीत उघड्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न
धारावीत उघड्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न
धारावीत उघड्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न
See all

धारावी - धारावीतील प्रभाग क्रमांक 184 मध्ये सोयी-सुविधांच्या अभावामुळे दिवसेंदिवस स्वच्छतेचा प्रश्न डोके वर काढू लागलाय. या प्रभागात ओसंडून वाहणारी गटारं, शौचालयाची दुरवस्था, चिंचोळ्या गल्ली बोळातील उघडी गटारं यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. धारावीतील साईबाबनगर, मेहताब चाळ, सोशलनगर, कावळे चाळ, सरबत चाळ आदी भागांतील गटारे उघडी असल्यानं येथील परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढीस लागलाय. वारंवार पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे पालिका अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप समाज सेवक इम्रान शेख यांनी केलाय. दरम्यान सदर विभागाची पाहणी करण्यात आली असल्याचं पालिका जी-उत्तर विभाग घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Loading Comments